Skip to main content

इसवी सन 010101


                             जिवाच्या आकांताने मी धावत सुटले होते.कितीतरी मैल मी धावतच होते पण रस्ता काही संपत नव्हता.भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत एका नवीन टाइमर मशीन वर कॉम्पुटर प्रोग्रामिंग चा सहसंबंध लावण्याच काम करताना अचानक कुठेतरी येऊन पडल्यासारखे वाटलं.4-5 माणसे माझ्या मागे लागली होती,पण खरं ती माणसं च होती की कोण दुसरे प्राणी असा प्रश्न मला पडला, कारण संपूर्ण शरीरयष्टी माणसांसारखीच होती पण अंगावर बऱ्याच ठिकाणी कॉम्पुटर च्या programming languages अन codes लिहिलेले होते.tattoo काढल्यासारखी संपूर्ण शरीरावरची त्वचा नक्षीदार वाटत होती.प्रत्येकाच्या डोक्यावर टोपीऐवजी मुकुट होते.त्या हिरेजडित मुकुटावर चमचमते अँटेना सेन्सर होते.ते लोक कोण आहेत हे विचार करतच मी पळत होते.संपूर्ण शरीर घामाने डबडबलेल होतं अन अचानक कोणीतरी पाठीमागून विनाशस्त्राचाच लेझर प्रहार केल्याचं मला जाणवलं ,क्षणार्धात डोकं सुन्न झाल अन मी धाडकन जमिनीवर कोसळले.मी अर्धवट बेशुद्धावस्थेत होते,त्या माणसाचे बोलणे कानावर पडत होते पण नीट भाषा समजत नव्हती ,तरी त्यांच्या  हालचालीवरून ते मला कुठेतरी नेणार आहेत हे मी ताडल होतं,पण अंगात काहीच त्राण नसल्यामुळे मी आहे त्या जागी निपचित पडून राहिले.
‌                  थोड्या वेळानं मला जाग आली ,सूर्यकिरण डोळ्यावर पडत होते .तिथूनच माझं शरीर मला नेहमीपेक्षा खूप हलकं वाटायला लागलं होतं.मी तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.फोन करायला खिसा चाचपला ,पण माझा मोबाइल गायब!मी तिथून बाहेर आले तर नुकतंच उजडून थोडा वेळ झालेला होता .पुढे मार्ग शोधण्यासाठी मी  खिशातून दिशादर्शक काढले तर... जगातलं ,जगातलं नव्हेच संपूर्ण अवकाशातल सगळ्यात मोठं आश्चर्य मी बघितलं.दिशादर्शकानुसार उत्तर दिशा समजली,त्यावरून पूर्व,पश्चिम अन दक्षिण दिशा मी ताडली पण  उगवलेल्या सूर्याकडे मी पाहिले तर त्याची उगवण्याची दिशा ही दिशादर्शकानुसार पश्चिम दिशा होती!...मी गोंधळले !मला पुढे योग्य मार्ग शोधण्यासाठी global positioning system सारखा दिशा दर्शकाचा वापर होणार होता पण इथे सूर्य उगवणारी दिशा पश्चिम आहे तर उत्तर अन दक्षिण कुठे याच्या संभाव्यता काढण्यात माझा दुपारपर्यंत वेळ गेला.आता सूर्य डोक्यावर आला होता.पण इथे आश्चर्याचा दुसरा धक्का मला बसला तो म्हणजे, माझे घड्याळ ही वेळ दुपारी 4 ची दाखवत होते.घड्याळ बिघडलं तर नाही ना , तपासून बघितलं तर घड्याळ ही ठीक ठाक होत अन सेल ही 2 दिवसांपूर्वी टाकल्यामुळे ते संपण्याचा प्रश्न नव्हता.सूर्य डोक्यावर अन घड्याळात वेळ 4 ची! सूर्याची उगवण्याची दिशा ,माझ्या दिशादर्शकातील दिशा  अन  घड्याळातली वेळ हे गणितच कुठे जुळत नव्हतं.सूर्य उगवल्या पासून ते मावळेपर्यंत मी घड्याळ वेळेवर लावायला तास मोजत होते पण झालं उलटंच!दिवस उलटून गेला तेव्हा घड्याळात तब्बल तीन वेळा 24 तास होऊन गेले म्हणजे 72 तासाचा एक दिवस झाला!उत्तर ध्रुव अन दक्षिण ध्रुवावर 6 महिन्याची दिवस रात्र असते हे माहीत होतं मला पण 72 तासांचा दिवस??हे तर नवलच होत!मला गेल्या एक दिवसात तिथे फक्त आश्चर्य अन आश्चर्यच बघायला भेटत होती. मला माझी तिथून सुटका करून घ्यायची होती ,मला पुन्हा माझ्या माणसांच्या जगात यायचं होत म्हणून आणखी वेळ न दवडता मी पूर्वेलाच पश्चिम दिशा मानून पुढे प्रस्थान केलं.
              आगडोंब होऊन भुकेने पोटात कावळे ओरडत होते म्हणून आधी पेटपूजा करू ठरवल.तिथुन चालत चालत पुढे आले ,एक भव्य दिव्य नगर मी बघितलं .अक्षरशः माझे डोळे दिपून गेले,इतकी भव्य नगरी!स्वप्नातही कधी न बघितलेली नगर रचना मी तिथे बघितली ,तिथल्या engineersनी कोणत्या पद्धतीने ही घरी बांधली असावी? हा प्रश्न मला पडला,कारण जागा पुरत नाही म्हणून मुंबा नगरीत समुद्रावर भरी टाकून बांधलेली घरे मी बघितली होती पण इथे तर ,एकावर एक घरे अन ती ही हवेतच !न्यूटन चा गुरुत्वाकर्षण सिद्धांत इथे साफ खोटा ठरतोय वाटलं. बहुतेक जमिनीच्या गर्भातील "g" ची किंमत बदलण्याच तंत्र या लोकांना अवगत झालेलं होत.माणूस पृथ्वीवरून मंगळावर जाऊन पोहोचला अन तिथे वस्ती करायचं स्वप्न त्याने बघितलं पण पृथ्वीच्या "g"ची किंमत अशी बदलता येऊ शकेल हे स्वप्नातही तो बघू शकला नसेल!इतकंच नव्हे तर नगरात एकही विजेचा खांब नव्हता,प्रत्येक घरात वीजपुरवठा वायरलेस होत होता,हे सगळंच अद्भुत होत कारण मी आत्तापर्यंत फक्त मोबाइल साधनांना वायरलेस इंटरनेट अन बलुटूथ कनेक्टिव्हिटी बघितली होती.पण इथे तर वीजही वायरलेस !मी संभ्रमात पडले की,प्रोटोन्स अन इलेक्ट्रॉन कुठल्या प्रकारच्या हवेतून (माध्यमातून)प्रवास करत असतील जी या लोकांनी इथे तयार केली होती?
‌                 काहीतरी खायला मिळावं म्हणून मी एका दुकानात गेले ,दुकानंतले पदार्थ बघून माझ्या अन या लोकांच्या आहारात साम्य आहे हे समजलं तेव्हा मी थोडा सुटकेचा सुस्कारा सोडला!पन आश्चर्याच्या धक्क्यांचा प्रवास इतक्यात थांबला नाही,डाळ अन रोटी खाऊन पैसे द्यायला मी गेले, तर त्यांनी मला काही किंमत सांगितली पण भाषेच्या अडथळ्यामुळे मला समजलं नाही ,तर त्यांनी मला हाताने खुणा करून सांगितले. बघितल तर काय! एका हाताला 7 बोटे...!मी अवाक झाले!हाताने  खुणा करून7+7 असे 14 रुपये त्यांनी मला सांगितले,मला वाटलं या दुकानदाराला अपघाताने 7 बोटे असतील,पण आजूबाजूला सर्वच माणसांच्या हाताला 7 बोटे होती . माझ्या हाताला 5 च बोटे असल्यामुळे माझ्या मते 5+5 असे 10 च रुपये झालेले.मी त्यांना 14 रुपये दिले पण चार्ल्स डार्विन च्या उत्क्रांती च्या अभ्यासात पृथ्वीवरच्या मानवाचे विज्ञान किती मागे आहे याची अनुभूती मला आली.जुना मानव ड्रायओपीथेकस,रामापीथेकस,निअँडर्थेल अन आधुनिक होमो सेपिअन्स यांच्या यादीत कुठेच 7 बोटे असलेल्या माणसाचा उल्लेख नव्हता.बाहेरून हात पाय असे तर यांच्या मेंदू मध्ये काय उत्क्रांती झाली,या लोकांचे chromosomes अन genes सामान्य माणसापेक्षा काय वेगळे असतील हा विचार मी करायला लागले.
                  पुढे आणखी एक गोष्ट लक्षात आली ,अन आश्चर्याचा कहर च झाला.माझ्या मागे धावत असणारी माणसे पुन्हा मला पकडायला आली. एक कॉम्पुटर प्रोग्रामिंग language होती ,त्या सगळ्यांनी एकत्र म्हणली तेव्हा आम्ही एका भल्या मोठ्या राजवाड्यात येऊन पोहोचलो.एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला गाडी चा ,जहाजाचा अन विमानाचा वापर करतात माहिती होत ,पण programing language वरचा प्रवास आजन्मात केला नव्हता!मला प्रश्न पडला ,अशी कोणती technology याना अवगत आहे जी केवळ कॉम्पुटर प्रोग्रामिंग language वर स्वतःचा प्रवास घडवून आणू  शकते?आणि महत्वाचं म्हणजे ही techonology या प्रत्येकाला अवगत होती.त्यांच्या मेंदू मध्ये अशा चिप्स बसवल्या आहेत ?की आनुवंशिकतेने genes द्वारे ही प्रोग्रामिंग language यांना मिळाली आहे ? हे शेवटपर्यंत मला समजलंच नाही!
                  तिथे त्यांची एक मुख्य व्यक्ती होती,बहुधा या लोकांचा तो प्रमुख असावा!त्याच्या बाजूला असणाऱ्या एका व्यक्तीकडे मी बघितलं तर त्याचे डोळे तिथल्या विचित्र लोकांपेक्षाही मला वेगळे वाटले.त्याच्या डोळ्यातच मूळ सीसीटीव्ही बसवलं असल्यासारखे गेल्या 3 दिवसात मी कुठे कुठे गेले,काय खाल्लं हे सगळं चित्रीकरण सर्वांना दाखवलं!जणू महाभारताच युद्ध संजय धृतराष्ट्राला दाखवत आहे अन त्या प्रसंगात मी उपस्थित आहे असा भास मला झाला.पण प्रात्यक्षिक विचार केला तर डोळ्यात सीसीटीव्ही बसवता येतोय हे तंत्रज्ञान याना अवगत आहे तर या दुनियेमधले लोक हे कोणी सामान्य नाहीत हे मला समजलं.
               माझी पूर्ण चाचपणी केल्यानंतर माझ्यापासून काही धोका नाही ,अन मी त्यांची कोण दुष्मन देखील नाही हे त्यांच्या लक्षात आलं.त्यांनी माझा यथोचित सन्मान केला.मला माझा मोबाईल देखील परत केला अन पुन्हा माझी, माझ्या दुनियेत रवानगी करण्याची व्यवस्था केली.जाताना तिथल्या खासियत असणाऱ्या गोष्टी दिल्या मात्र त्यांनी त्यांच्या तंत्रज्ञानाची गुरुकिल्ली मला दिली नाही, पण तितक्या प्रमाणात मानवाच तंत्रज्ञान निर्माण करन्यास प्रयत्नशील राहायला सांगितलं.
                  पुन्हा एकदा एक कॉम्पुटर प्रोग्रामिंग language त्यांनी उच्चारली ,बघितलं तर काय !माझ्या प्रयोगशाळेत मी पुन्हा टाइमर च काम करत असलेल्या मूळ ठिकाणी पोहोचले, अन माझ्या कामास मी पुन्हा जोमाने सुरुवात केली ,अगदी तेच तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी...!
                 
                   

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Taali

 Taali           खरंच कौतुक करावं वाटत , या series मधल्या प्रत्येक कलाकाराचं आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे गौरी सावंत यांची भूमिका केलेल्या सुश्मिता सेन चं ! आपल्यासमोर फक्त टाळ्या वाजवणारे आणि टोल नाक्यांवर ,रेल्वे मध्ये पैसे मागणारे म्हणून ज्यांची प्रतिमा तयार होते त्या व्यक्तीचे वैयक्तिक आयुष्य ,त्याला सोसावी लागणारी स्थित्यंतरे ...खरंच हृदय पिळवटून टाकणारी आहेत . स्त्री आणि पुरुष याच्या ही बाहेर एक नैसर्गिक जीवन आहे पण आपल्यात ते समाजमान्य नाही म्हणून जगण्याचा अधिकार च नाही का? यावरची बरीच उत्तरे 'गौरी सावंत' यांच्या प्रवासातून मिळतात . त्यांचा 'गणेश ते गौरी' हा प्रवास या समुदायाच्या जगण्याविषयी विचार करायला भाग पाडतो .       सिरीज मधले प्रसंग बघून आपल्या आजूबाजूला या घटना होत असतात ,आपण त्याकडे संवेदनशीलतेनेही बघायची तसदी घेत नाही ,त्या किती विक्षिप्त आहेत याची प्रचिती येते. या सिरीज मधला सगळ्यात जास्त टोचलेला प्रसंग तो म्हणजे, नर्गिस ची death आणि त्यानंतर फक्त dead body स्ट्रेचर वर ठेवण्यात यावी या मागणीला असंवेदनशील लोकांनी केलेला विरोध ! हे बघताना खर

तूच तुझी वैरीण

                  आज दुपारी कॉलेज वरून येताना एका ठिकाणी द्राक्षे विकत घ्यायला थांबले. द्राक्षांचा दर उतरत येत असल्याने मी ही पाडून दरात द्राक्षे मागितली .द्राक्षे विकणारी व्यक्ती या एक वयस्कर आजीबाई होत्या .उन्हाची धाप लागून त्यांना चक्कर येत होती.मी माझ्या बॅगेतली पाण्याची बाटली काढून त्यांना दिली.भर उन्हात सहन होत नसतानाही हे काम का करताय असा सहानुभूती पूर्वक प्रश्न त्यांना मी केला . "बाई पोटासाठी झिजावं लागतंय" अस त्या उत्तरल्या. कष्ट केल्याशिवाय तर आयुष्याला पर्याय नाही ,रोजीरोटीसाठी काम करणं हाच संसाराचा राहाटगाडगा यामध्ये नवल नाही पण, "आजी इतकं वय झालेलं असताना ,शरीराला झेपत नसताना का राबताय?" म्हणून विचारलं त्यावर त्या म्हणाल्या "जगत आहे तोपर्यंत माणसाने कामात गुंतवून घेतलं पाहिजे ,आमचे मालक पोरग लहान असतानाच वारले ,एकट्या पोराला घेऊन आज इथवर आले ,इकडं तिकड काम करून त्याच शिक्षण अन लग्न करून दिल,त्याच्या जबाबदारी तुन निवांत झाले पण जगण्यासाठी दोन पैसे घरात आणले पाहिजेत,मी नाही कमवल तर सून घरात आयत देणार नाही .या वयात बाहेरची परवड होणार नाही ग,त्यापेक्षा

थरार

                   नेहमीसारखाच आजही व्यायामशाळेतून यायला उशीर झाला होता .व्यायामशाळेत जाण्यासाठी आम्हाला रोज परळीचा घाट पार करून सातारला जावं लागतं ,अंतर तस फार नाही अकरा किलोमीटर आहे पण रस्ता मात्र घाटाचा अन डोंगररांगांनी वेढलेला ! रात्री अपरात्रीच्या वेळी मुलीनी इतका वेळ घराबाहेर थांबू नये म्हणून घरची मंडळी सतत ओरडतात, पण निशु ताई अन मी काही आमच्या व्यायामाच्या वेळेत हयगय करत नाही. आमच्या ठरलेल्या वेळेत च म्हणजे साडे नऊ च्या दरम्यान घरी येतो . आजही सगळा व्यायाम उरकून , आरशात बघत शरीरयष्टी चे भारदस्त फोटो काढले. फ्रेश होऊन गाडीला किक मारली अन घरी यायला निघालो. व्यायामाने थकलेल्या शरीराला खूप भूक लागली होती , घरी लवकर पोहोचून गरमागरम ताटावर ठाण मांडायला मिळावं म्हणून गाडीचा वेग मी वाढवला होता . सुनसान अशा त्या आडबाजूच्या घाट रस्त्याला गाड्यांची वर्दळ फार नव्हती पण अंधारलेल्या समयी रातकिड्यांच्या कीर्र आवाजात भीतीदायक माहोल तयार झाला होता .वाटेत लागणाऱ्या उरमोडीच्या पुलाशेजारीच गावची स्मशानभूमी आहे .त्या पुलावरून जाताना एका सालात एक तरी बळी 'ती' घेतेच अश