Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

इसवी सन 010101

                             जिवाच्या आकांताने मी धावत सुटले होते.कितीतरी मैल मी धावतच होते पण रस्ता काही संपत नव्हता.भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत एका नवीन टाइमर मशीन वर कॉम्पुटर प्रोग्रामिंग चा सहसंबंध लावण्याच काम करताना अचानक कुठेतरी येऊन पडल्यासारखे वाटलं.4-5 माणसे माझ्या मागे लागली होती,पण खरं ती माणसं च होती की कोण दुसरे प्राणी असा प्रश्न मला पडला, कारण संपूर्ण शरीरयष्टी माणसांसारखीच होती पण अंगावर बऱ्याच ठिकाणी कॉम्पुटर च्या programming languages अन codes लिहिलेले होते.tattoo काढल्यासारखी संपूर्ण शरीरावरची त्वचा नक्षीदार वाटत होती.प्रत्येकाच्या डोक्यावर टोपीऐवजी मुकुट होते.त्या हिरेजडित मुकुटावर चमचमते अँटेना सेन्सर होते.ते लोक कोण आहेत हे विचार करतच मी पळत होते.संपूर्ण शरीर घामाने डबडबलेल होतं अन अचानक कोणीतरी पाठीमागून विनाशस्त्राचाच लेझर प्रहार केल्याचं मला जाणवलं ,क्षणार्धात डोकं सुन्न झाल अन मी धाडकन जमिनीवर कोसळले.मी अर्धवट बेशुद्धावस्थेत होते,त्या माणसाचे बोलणे कानावर पडत होते पण नीट भाषा समजत नव्हती ,तरी त्यांच्या  हालचालीवरून ते मला कुठेतरी नेणार आहेत हे मी ताडल होतं,