Skip to main content

Posts

Showing posts from July, 2020

काहूर

                                                                                           अंधारलेली काळरात्र... सन्नाटा करणारा आवाज... गर्द झाडीतून ...रस्त्यावरून दमकणार्‍या काजव्यांचं लुकलुकणारं ते रूप... निरभ्र आकाशात शापित चांदण्यांचं राज्य, सूर्याचं साम्राज्य अस्त पावलं म्हणून जणू काही राजा चांदोबाच्या महालात वर्चस्व दाखवणाऱ्या दीड-दमडीच्या 'या' कुशलतेने पृथ्वीवर देखरेखच ठेवत होत्या ... असा हा सगळा प्रसंग असताना ,मी मात्र एक कवी ...काय बरं प्रासंगिक  कविता करणार या सगळ्यावर ?ऐन तारुण्यात बहरलेल्या यौवणावर प्रणयकाळाच्या कविता खरतर सुचायला हव्या होत्या, पण माझ्या मनात  एक भलतीच हुरहुर लागलेली लागलेली होती.निरभ्र आकाशातल्या या चांदण्या पाहून खरंतर प्रेम कविता करण्याचा मोह आज पर्यंत मला कधीच आवरला नाही पण आज... आज माझी मजल यांना शापीत म्हणण्यापर्यंत पोहोचली होती. न राहवता मीच या सर्व विचारातून सुटका मिळवण्यासाठी एक फेरफटका मारून यावं यावं म्हटलं.गस्त घालणाऱ्यांखेरीज आता या घडीला कोण बरं भेटेल ?रात्रीचे सुमारे बारा वाजून गेले होते, "बागुलबुवा येईल हं! बाहेर अजिबात डोकवायचं

14 दिवसांचा पाहुणचार

                                              'दिल है छोटासा ,छोटीसी आशा... आसमानो में उडने की आशा...'अशीच एक छोटीशी माझी इच्छा मी त्या दिवशी बकेट लिस्ट मध्ये लिहून ठेवली. डेहराडून फ्लॅइंग स्कुल मधून pilot licen मिळवायची!2020 मधली ही एक ईच्छा पूर्ण व्हावी म्हणून सगळ्या eligibilities पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो.कॉलेज च्या या शेवटच्या वर्षी तशी आव्हान भरपूर होती...daily च्या assignments, मिड टर्म्स,सेमिस्टर्स, प्रोजेक्ट्स...जबाबदाऱ्याही तितक्याच सक्षमपणे पार पाडत होतो,अगदी कशातच कमी पडत नव्हतो.           तसा तर मी मूळचा सातारा जिल्ह्यातील रहिवासी.सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं राजापुरी हे माझं गाव.12 वी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन इंजिनिअरिंग साठी पुण्यात कॉलेज ला आलो.पहिल्यापासूनच पुणे या शहराविषयी एक भलतंच आकर्षण होत.हॉस्टेल वर राहायला लागलो...थोड्याच दिवसात मला पुणे मानवलं!हॉस्टेल अन कॉलेज मधल्या मित्रांनी अन शिक्षकांनी गावची कमी भासू दिली नव्हती.जे यश मिळवण्यासाठी पुण्यात आलो होतो ते पुणे शहर आता माझी कर्मभूमी बनलेली होती.         सुरळीत चाललेल्या या मेहनती आयुष्यात

मोठी स्वप्ने बघूच नका...

"मोठी स्वप्ने बघूच नका..."              काळाचा तडाखा कोणाला सुटला आहे?वर्ष 2020...कोरोना महामारीचे सावट.... लॉक डाउन...स्थलांतर...वर्क फ्रॉम होम...कंपन्या बंद...असा हा फटका संपूर्ण मनुष्यजातीला!वाचकांना स्वतः या परिस्थितीमधील भीषण परिणामांना सामोरे जावे लागले आहे,त्यामुळेच प्रस्तुत लेखात महामारीचे वर्णन करून मी वाचकांचा वेळ घेऊ इच्छित नाही.एकही क्षेत्र या तडाख्यातून सुटले नाही तर शिक्षण क्षेत्र तरी कसं काय अपवाद ठरेल?               महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत खंड पडू नये,त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासन व विविध शिक्षण संस्था संयुक्तिक रित्या काही उपक्रम राबवत आहेत,ऑनलाइन शिक्षण पद्धती नामक एका नवीन योजनेचा अवलंब आता केजी पासून ते पदवी अन पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी  केला जात आहे.अशा  पद्धतीच्या शिक्षणामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांसमोर फक्त स्क्रीन च्या माध्यमातून ऑडिओ visual पद्धतीने संवाद साधू शकतात.एकंदरीतच काय तर शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत कुठेही खंड पडत नाहीये ही सुखावह बाब आहे.नेटवर्क प्रॉब्लेम्स, कनेक्टिव्हिटी अन आवश्यक साधन साम