Skip to main content

Taali

 Taali

          खरंच कौतुक करावं वाटत , या series मधल्या प्रत्येक कलाकाराचं आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे गौरी सावंत यांची भूमिका केलेल्या सुश्मिता सेन चं ! आपल्यासमोर फक्त टाळ्या वाजवणारे आणि टोल नाक्यांवर ,रेल्वे मध्ये पैसे मागणारे म्हणून ज्यांची प्रतिमा तयार होते त्या व्यक्तीचे वैयक्तिक आयुष्य ,त्याला सोसावी लागणारी स्थित्यंतरे ...खरंच हृदय पिळवटून टाकणारी आहेत . स्त्री आणि पुरुष याच्या ही बाहेर एक नैसर्गिक जीवन आहे पण आपल्यात ते समाजमान्य नाही म्हणून जगण्याचा अधिकार च नाही का? यावरची बरीच उत्तरे 'गौरी सावंत' यांच्या प्रवासातून मिळतात . त्यांचा 'गणेश ते गौरी' हा प्रवास या समुदायाच्या जगण्याविषयी विचार करायला भाग पाडतो .
      सिरीज मधले प्रसंग बघून आपल्या आजूबाजूला या घटना होत असतात ,आपण त्याकडे संवेदनशीलतेनेही बघायची तसदी घेत नाही ,त्या किती विक्षिप्त आहेत याची प्रचिती येते.
या सिरीज मधला सगळ्यात जास्त टोचलेला प्रसंग तो म्हणजे, नर्गिस ची death आणि त्यानंतर फक्त dead body स्ट्रेचर वर ठेवण्यात यावी या मागणीला असंवेदनशील लोकांनी केलेला विरोध ! हे बघताना खरंच प्रश्न पडतो, जिवंतपणी सन्मान नाहीच पण मरणानंतर ही सन्मानाने मरण नाही?
            भारतमाता म्हणतो तर आईसाठी सगळे समान च ना ? पण स्त्री पुरुष म्हणून आपल्याच समजात भेद करणारे आपण कोण? प्रत्येकाला सन्मानाणे जगण्याचा अधिकार आपल्या संविधानाने आपल्याला दिला पण या समूदायाला सन्मान सोडा आपण आपल्यामध्ये mix करून घ्यायला ही नाक मुरडतो.संविधानाने कलमांमध्ये तरतूद केली तरी समाजात चित्र वेगळंच दिसत !आपल्या आनंदाच्या क्षणी आपल्याला शुभेच्छा द्यायला येणाऱ्या व्यक्तींसाठी आपण इतकं असंवेदनशील असावं? कारण फक्त एकच आपली संकुचित बुद्धी ! मुलाने त्याची मर्दनगी जपायची स्त्री ने तीच स्त्रीत्व जपायचं ही आपल्या समाजातली चौकट घालून दिलेली रीत , पण त्याच्या आधी माणूस म्हणून 'माणुसकी' जपली तर या समुदायाला सामोरे जावे लागणारे प्रश्न बरेचसे मिटतील कारण स्त्री आणि पुरुष होण्याआधी आपण सगळे एक माणूस आहोत.
         लढाई जितेंगे ...कैसे? पढाई से !!!
         बऱ्याच वर्षांपूर्वी आपल्यातल्या समाजसुधारकानी पुढाकार घेऊन बऱ्याच मागे पडलेल्या आणि गांजलेल्या समजाला शिक्षण देऊन एका नैतिक प्रवाहात आणलं . शिक्षणांने त्यांचं आयुष्य पालटून गेलं ! तसच या समुदायाला ही शिक्षण भेटलं तर आपल्या प्रवाहात येतील ,फक्त आपण आपली संकुचित बुद्धी बाजूला ठेवून त्यांना आपल्यापैकी च एक माणूस म्हणून स्थान आहे हे मान्य केलं पाहिजे ! हे एक सामाजिक स्थित्यंतर आहे ,एका रात्रीत बदलण्याची गोष्ट नाही. फक्त आपला यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त टाळी पुरता न ठेवता एक माणूस म्हणून ठेवला तर नक्कीच ते आपल्यासोबत सामाजिक प्रवाहात येतील.
            गौरी सावंत यांची लढाई वाखाणण्याजोगी आहे. आपण विचार ही नाही करू शकत इतक्या छोट्या छोट्या गोष्टींना या समुदायाला सामोरे जाव लागतं. या सिरीज ने फक्त गणेश ते गौरी हा प्रवास च नाही तर सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या आपल्यासारख्या प्रत्येकावरच, तू स्त्री किंवा पुरुष नसून त्याआधीही तू माणूस आहेस ,या माणुसकीवर आणि सजीव म्हणवून घेणाऱ्या असंवेदनशील संकुचित बुद्धीवर चपराख लगावली आहे .
-भक्ती पानसरे

Comments

Popular posts from this blog

काकस्पर्श

  मराठी चित्रपटांना cringe म्हणणाऱ्यांवर जबरदस्त चपराक मारणारा हा चित्रपट ! जसं की चित्रपटाच्या नावातच आहे काकस्पर्श ,नावावरून एक प्रचिती येते त्याप्रमाणे हिंदू धर्मात पिंडदानात दशक्रियेविधी दरम्यान कावळ्याच्या भूमिकेला जे महत्व आहे त्याचा संदर्भ असलेला हा चित्रपट आहे पण चित्रपट बघताना अगदी शेवटी महादेवच्या पिंडदाना वेळी झालेला काकस्पर्शाचा प्रसंग उमेचं पूर्ण आयुष्य दुःखाच्या खाईत कशा प्रकारे लोटून देतो सोबतच स्वातंत्र्य पूर्व काळात विधवा निराधार स्त्रियांची ,सन्मान सोडाच पण फक्त जगण्यासाठी झालेली ससेहोलपट या चित्रपटात जबरदस्त स्पष्ट रेखाटली आहे . चित्रपट पाहताना खरंच प्रश्न पडतो की आज स्त्रियांना समाजात समाजाकडून जे स्वातंत्र्य मिळालं आहे त्याचा इतिहास किती भयंकर आहे . अगदी 14-15 व्या वर्षी विधवा झालेली उमा , संपूर्ण आयुष्य न मिळालेल्या लैगिंक सुखाची अनुभीती नेमकी कशी असते ही भावना घेऊन शेवटी मरून जाते. स्त्रीच्या आयुष्यात नवरा नसेल तर तीच जगणं समाजाने किती हराम करून टाकलं होतं या उमेच्या भूमिकेला अभिनेत्री प्रिया बापट ने पूर्ण न्याय दिला आहे. पूर्वीच्या काळीच्या रितींनुस...

Frankenstein (2025)

Have you ever imagined life without death? The movie begins with this feeling hidden beneath the opening scene  a ship frozen in the middle of nowhere and a terrified man pulled out of the ice. His face tells you everything: he isn’t afraid of the world… he’s afraid of what he created. Right from the start, the film shows that this is not just about a monster, but about a man who tried to control life itself and now can’t escape the consequences. Directed by Guillermo del Toro and produced by Guillermo del Toro, J. Miles Dale, and Scott Stuber, Frankenstein (2025) follows the journey of Dr. Victor Frankenstein (Oscar Isaac), whose obsession with defeating death leads him to create a living being the Creature (Jacob Elordi). But instead of glory, he faces guilt, fear and heartbreak. Del Toro beautifully shows the creature as a misunderstood soul rather than a villain. Special Features & Highlights • Stunning Visuals – Snowy landscapes, dark labs, candlelit halls… every scene f...

तूच तुझी वैरीण

                  आज दुपारी कॉलेज वरून येताना एका ठिकाणी द्राक्षे विकत घ्यायला थांबले. द्राक्षांचा दर उतरत येत असल्याने मी ही पाडून दरात द्राक्षे मागितली .द्राक्षे विकणारी व्यक्ती या एक वयस्कर आजीबाई होत्या .उन्हाची धाप लागून त्यांना चक्कर येत होती.मी माझ्या बॅगेतली पाण्याची बाटली काढून त्यांना दिली.भर उन्हात सहन होत नसतानाही हे काम का करताय असा सहानुभूती पूर्वक प्रश्न त्यांना मी केला . "बाई पोटासाठी झिजावं लागतंय" अस त्या उत्तरल्या. कष्ट केल्याशिवाय तर आयुष्याला पर्याय नाही ,रोजीरोटीसाठी काम करणं हाच संसाराचा राहाटगाडगा यामध्ये नवल नाही पण, "आजी इतकं वय झालेलं असताना ,शरीराला झेपत नसताना का राबताय?" म्हणून विचारलं त्यावर त्या म्हणाल्या "जगत आहे तोपर्यंत माणसाने कामात गुंतवून घेतलं पाहिजे ,आमचे मालक पोरग लहान असतानाच वारले ,एकट्या पोराला घेऊन आज इथवर आले ,इकडं तिकड काम करून त्याच शिक्षण अन लग्न करून दिल,त्याच्या जबाबदारी तुन निवांत झाले पण जगण्यासाठी दोन पैसे घरात आणले पाहिजेत,मी नाही कमवल तर सून घरात आयत देणार नाही .या वयात बाहेरची परवड होणा...