Skip to main content

मोठी स्वप्ने बघूच नका...

"मोठी स्वप्ने बघूच नका..."

             काळाचा तडाखा कोणाला सुटला आहे?वर्ष 2020...कोरोना महामारीचे सावट.... लॉक डाउन...स्थलांतर...वर्क फ्रॉम होम...कंपन्या बंद...असा हा फटका संपूर्ण मनुष्यजातीला!वाचकांना स्वतः या परिस्थितीमधील भीषण परिणामांना सामोरे जावे लागले आहे,त्यामुळेच प्रस्तुत लेखात महामारीचे वर्णन करून मी वाचकांचा वेळ घेऊ इच्छित नाही.एकही क्षेत्र या तडाख्यातून सुटले नाही तर शिक्षण क्षेत्र तरी कसं काय अपवाद ठरेल?
              महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत खंड पडू नये,त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासन व विविध शिक्षण संस्था संयुक्तिक रित्या काही उपक्रम राबवत आहेत,ऑनलाइन शिक्षण पद्धती नामक एका नवीन योजनेचा अवलंब आता केजी पासून ते पदवी अन पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी  केला जात आहे.अशा  पद्धतीच्या शिक्षणामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांसमोर फक्त स्क्रीन च्या माध्यमातून ऑडिओ visual पद्धतीने संवाद साधू शकतात.एकंदरीतच काय तर शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत कुठेही खंड पडत नाहीये ही सुखावह बाब आहे.नेटवर्क प्रॉब्लेम्स, कनेक्टिव्हिटी अन आवश्यक साधन सामग्री चा अभाव या गोष्टी लक्षात घेऊन एक वर्ग 'ऑनलाइन शिक्षण पद्धती'ला विरोध करतोय तर दुसरीकडे,शिक्षण प्रक्रिया अविरत यथासांग पार पडतेय म्हणून एक वर्ग त्याच समर्थन करत आहे.ऑनलाइन शिक्षण पद्धतीचे समर्थन करणारा ही हा तोच वर्ग आहे ज्यांच्याकडे ऑनलाइन शिक्षण अनुरूप सामग्री म्हणजेच मोबाईल किंवा कॉम्प्युटर्स ,इंटरनेट उपलब्ध आहे आणि मुबलक प्रमाणात डाटा उपलब्ध आहे,ज्यांच्या महिन्याच्या बजेट मध्ये आपल्या पाल्यांसाठी इंटरनेट पॅकस सुद्धा अत्यावश्यक गरजेमध्ये गणला जातो.इथे डाटा पॅकस ची जरी मी अतिशयोक्ती केली असेल तरी ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही.
                वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा मूळ मुद्दा असा की,शासनाने ऑनलाइन शिक्षनाचा निर्णय घेताना त्यासाठी आवश्यक सामग्री(उपरोक्त)त्याचा अभाव अथवा पुरवठा अशा कोणत्याही गोष्टी लक्षात घेतल्या  नाहीत.सर्वच विद्यार्थ्यांकडे या सामग्री उपलब्ध आहेतच असे गृहीत धरून हा निर्णय घेतला गेला अन आज या निर्णयामुळे सामग्रीचा अभाव असणारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.सर्वांसाठी 'समान न्याय'या अनुसार त्यांच्यावर अन्याय च होत आहे.
               'सर्वसमावेशक शिक्षण'हा विचार केला तर जे विद्यार्थी मुळातच खूप प्रयत्नांती शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात,खडतर आर्थिक परिस्थिती शिक्षणाआड येऊ नये म्हणून 'कमवा अन शिका'योजनेचा लाभ घेतात,शिक्षणातील खर्चामुळे पोटा पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून कॉलेज नंतर पार्ट टाईम काम करतात त्या सर्वांकडेच उपरोक्त सामग्री अन डाटा पॅकस साठीचे पैसे आहेतच असे गृहीत धरणेच मुळात चुकीचे आहे.(गुगल मीट साठी तासाला 1gb असे प्रमाण असल्याने ते त्यांना परवडणारे नाही).डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या व तेथील शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे सुलभ इंटरनेट सेवा चालू आहे हे अपेक्षित ही नाही.इतरत्र कॉलेज मध्ये आपण प्रत्येकी विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल अन इंटरनेट बघत असलो तरी लॉक डाउन मुळे बजेट ची विल्हेवाट लागलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील पालकांना ही इतक्या किमतीचे डाटा पॅकस परवडणारे नाहीत.हलाखीच्या परिस्थिती मध्ये जगत असणारे पालक देखील पूर्ण दिवस रोजगारावर जाऊन केवळ दोन वेळचे पोटभर जेवण आपल्या पाल्याना देऊ शकतात ,मग अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षण विषयक उपरोक्त गरजांकडे लक्ष देणे शासनाचे कर्तव्य नाही काय?
                              कोणताही निर्णय घेताना त्यावर विषय समित्या नेमल्या जातात अन सर्वसमावेशक निर्णय अगदी 'सर्वांना समान न्याय'या तत्वावरच ,या समित्यांच्या मागण्या ठरतात,अमीर उमराव ते तळागाळातील लोकांनाही अनुरूप असे निर्णय घेणे हेच सुराज्याचे व स्वराज्याचे प्रतीक आहे.या उक्तीप्रमाणे मग सामग्रीचा अभाव असणाऱ्या या वर्गावर ठरवून अन्याय केल्यासारखे आहे.
                   "ऑनलाइन शिक्षण पूर्णपणे चुकीचेच आहे"या मताची मी अजिबात नाही.परंतु, हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या ,सामग्रीचा अभाव असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण मिळायला हवे हे पटवून देणे इतकाच हेतू!ज्याठिकाणी पालकांनी मुलाला अधिकारी होण्याचे स्वप्न दाखवायचे,शिकून मोठा होण्यासाठी शिक्षण घेण्यास शाळेत पाठवायचे,स्वतःच्या पोटाला चिमटा काढून शिक्षणाचा खर्च करायचा त्या सर्व पालकांना 'आता मोठी स्वप्ने बघूच नका' असाच एकंदरीत इशारा देण्यात आलेला आहे.'सर्वसमावेशक ऑनलाइन शिक्षण'असा निर्णय न घेतल्यामुळे उपरोक्त वर्गाला  शिक्षण प्रवाहातून बाजूला ढकलण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.
                     शासनाने सर्व बाजुंनी विचार करून या प्रकियेबद्दलचा विचार करायला हवा होता.परंतु आता ही वेळ गेलेली नाही,ही  बाब लक्षात घेऊन आवश्यक ती सामग्री सर्वव्यापी करून ,त्या अनुषंगाने पुरवठा करून जर हा निर्णय घेतला गेला ,तर एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही!

                               -भक्ती चंद्रकांत पानसरे
               
               

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Taali

 Taali           खरंच कौतुक करावं वाटत , या series मधल्या प्रत्येक कलाकाराचं आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे गौरी सावंत यांची भूमिका केलेल्या सुश्मिता सेन चं ! आपल्यासमोर फक्त टाळ्या वाजवणारे आणि टोल नाक्यांवर ,रेल्वे मध्ये पैसे मागणारे म्हणून ज्यांची प्रतिमा तयार होते त्या व्यक्तीचे वैयक्तिक आयुष्य ,त्याला सोसावी लागणारी स्थित्यंतरे ...खरंच हृदय पिळवटून टाकणारी आहेत . स्त्री आणि पुरुष याच्या ही बाहेर एक नैसर्गिक जीवन आहे पण आपल्यात ते समाजमान्य नाही म्हणून जगण्याचा अधिकार च नाही का? यावरची बरीच उत्तरे 'गौरी सावंत' यांच्या प्रवासातून मिळतात . त्यांचा 'गणेश ते गौरी' हा प्रवास या समुदायाच्या जगण्याविषयी विचार करायला भाग पाडतो .       सिरीज मधले प्रसंग बघून आपल्या आजूबाजूला या घटना होत असतात ,आपण त्याकडे संवेदनशीलतेनेही बघायची तसदी घेत नाही ,त्या किती विक्षिप्त आहेत याची प्रचिती येते. या सिरीज मधला सगळ्यात जास्त टोचलेला प्रसंग तो म्हणजे, नर्गिस ची death आणि त्यानंतर फक्त dead body स्ट्रेचर वर ठेवण्यात यावी या मागणीला असंवेदनशील लोकांनी केलेला विरोध ! हे बघताना खर

तूच तुझी वैरीण

                  आज दुपारी कॉलेज वरून येताना एका ठिकाणी द्राक्षे विकत घ्यायला थांबले. द्राक्षांचा दर उतरत येत असल्याने मी ही पाडून दरात द्राक्षे मागितली .द्राक्षे विकणारी व्यक्ती या एक वयस्कर आजीबाई होत्या .उन्हाची धाप लागून त्यांना चक्कर येत होती.मी माझ्या बॅगेतली पाण्याची बाटली काढून त्यांना दिली.भर उन्हात सहन होत नसतानाही हे काम का करताय असा सहानुभूती पूर्वक प्रश्न त्यांना मी केला . "बाई पोटासाठी झिजावं लागतंय" अस त्या उत्तरल्या. कष्ट केल्याशिवाय तर आयुष्याला पर्याय नाही ,रोजीरोटीसाठी काम करणं हाच संसाराचा राहाटगाडगा यामध्ये नवल नाही पण, "आजी इतकं वय झालेलं असताना ,शरीराला झेपत नसताना का राबताय?" म्हणून विचारलं त्यावर त्या म्हणाल्या "जगत आहे तोपर्यंत माणसाने कामात गुंतवून घेतलं पाहिजे ,आमचे मालक पोरग लहान असतानाच वारले ,एकट्या पोराला घेऊन आज इथवर आले ,इकडं तिकड काम करून त्याच शिक्षण अन लग्न करून दिल,त्याच्या जबाबदारी तुन निवांत झाले पण जगण्यासाठी दोन पैसे घरात आणले पाहिजेत,मी नाही कमवल तर सून घरात आयत देणार नाही .या वयात बाहेरची परवड होणार नाही ग,त्यापेक्षा

थरार

                   नेहमीसारखाच आजही व्यायामशाळेतून यायला उशीर झाला होता .व्यायामशाळेत जाण्यासाठी आम्हाला रोज परळीचा घाट पार करून सातारला जावं लागतं ,अंतर तस फार नाही अकरा किलोमीटर आहे पण रस्ता मात्र घाटाचा अन डोंगररांगांनी वेढलेला ! रात्री अपरात्रीच्या वेळी मुलीनी इतका वेळ घराबाहेर थांबू नये म्हणून घरची मंडळी सतत ओरडतात, पण निशु ताई अन मी काही आमच्या व्यायामाच्या वेळेत हयगय करत नाही. आमच्या ठरलेल्या वेळेत च म्हणजे साडे नऊ च्या दरम्यान घरी येतो . आजही सगळा व्यायाम उरकून , आरशात बघत शरीरयष्टी चे भारदस्त फोटो काढले. फ्रेश होऊन गाडीला किक मारली अन घरी यायला निघालो. व्यायामाने थकलेल्या शरीराला खूप भूक लागली होती , घरी लवकर पोहोचून गरमागरम ताटावर ठाण मांडायला मिळावं म्हणून गाडीचा वेग मी वाढवला होता . सुनसान अशा त्या आडबाजूच्या घाट रस्त्याला गाड्यांची वर्दळ फार नव्हती पण अंधारलेल्या समयी रातकिड्यांच्या कीर्र आवाजात भीतीदायक माहोल तयार झाला होता .वाटेत लागणाऱ्या उरमोडीच्या पुलाशेजारीच गावची स्मशानभूमी आहे .त्या पुलावरून जाताना एका सालात एक तरी बळी 'ती' घेतेच अश