Skip to main content

14 दिवसांचा पाहुणचार

                         

                    'दिल है छोटासा ,छोटीसी आशा... आसमानो में उडने की आशा...'अशीच एक छोटीशी माझी इच्छा मी त्या दिवशी बकेट लिस्ट मध्ये लिहून ठेवली. डेहराडून फ्लॅइंग स्कुल मधून pilot licen मिळवायची!2020 मधली ही एक ईच्छा पूर्ण व्हावी म्हणून सगळ्या eligibilities पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो.कॉलेज च्या या शेवटच्या वर्षी तशी आव्हान भरपूर होती...daily च्या assignments, मिड टर्म्स,सेमिस्टर्स, प्रोजेक्ट्स...जबाबदाऱ्याही तितक्याच सक्षमपणे पार पाडत होतो,अगदी कशातच कमी पडत नव्हतो.
          तसा तर मी मूळचा सातारा जिल्ह्यातील रहिवासी.सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं राजापुरी हे माझं गाव.12 वी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन इंजिनिअरिंग साठी पुण्यात कॉलेज ला आलो.पहिल्यापासूनच पुणे या शहराविषयी एक भलतंच आकर्षण होत.हॉस्टेल वर राहायला लागलो...थोड्याच दिवसात मला पुणे मानवलं!हॉस्टेल अन कॉलेज मधल्या मित्रांनी अन शिक्षकांनी गावची कमी भासू दिली नव्हती.जे यश मिळवण्यासाठी पुण्यात आलो होतो ते पुणे शहर आता माझी कर्मभूमी बनलेली होती.
        सुरळीत चाललेल्या या मेहनती आयुष्यात 'मिठाचा खडा' पडावा अगदी तशीच लॉक डाउन ची बातमी धाडकन कानावर आदळली."आहे त्या अवस्थेत तुमचं गाव गाठा"अशा सक्त सूचना कॉलेज अन हॉस्टेल वरून देण्यात आल्या.पटापट समान बांधून घेतलं अन आहे त्या कपड्यांवरच लगेच गावाकडे रवाना झालो.रिक्षा,टॅक्सी,एस.टी... मिळेल त्या वाहनाने गावाकडे आलो.
        गावाच्या वेशीवरच गावकऱ्यांनी रेड सिग्नल दिला.पोटात भुकेचे कावळे ओरडत होते,घरी जाऊन दूध अन आईच्या हातची गरमागरम भाकरी कुस्करलेलं जेवण कधी जेवतोय अस झालेलं पण या उमद्या गावकऱ्यांनी लगोलग वेशिवरच्या मंदिराचा रस्ता दाखवला.बहुतेक मी यायच्या आधीच आम्हा पुणे-मुंबईकरांना गावात घ्यायचं नाही यावर गावकऱ्यांची चर्चा झालेली होती.पूर्वी गावात आल्यावर पाटलाच्या पोराचा माझा मान मला मिळायचा...तो यावेळी कोरोनानेच घेतला!!!
          मंदिरात गेलो,सामान ठेवलं.तिथं माझ्यासारखी बाहेरून पुन्हा गावचा रस्ता धरलेली पुण्या-मुंबईची मंडळी आलेलीच होती.ज्या आशेनं पुण्यावरून गावाला आलेलो...या माझ्या गावकडूनच माझी अशी उपेक्षा करण्याची वेळ या कोरोनामुळे येईल ...कधी कल्पनेतही वाटलं नव्हतं!
         या सर्व प्रवासात जवळ होते ते सगळे पैसे खर्च झाले होते.खिशात एक रुपया देखील शिल्लक नव्हता.पण मंदिरात का होईना ,पुण्यावरून आलेल्या अन हातावर quarantine शिक्का असलेल्या माझ्यासारख्याना आश्रय देण्याचं गावकऱ्यांनी नाकारलं नाही.कोरोना विषाणू चीन वरून आला,पण इथली माणसं अन माणुसकी दोन्ही भारतीयच!या  भारतीय माणुसकीचा खरा प्रत्यय तर मला तेव्हा आला जेव्हा ...जेवणाची अन राहण्याची आमची सोय गावामधल्या प्राथमिक शाळेत केली अन आमची कसलीही गैरसोय होणार नाही ही जबाबदारी प्रत्यक्षात गावकऱ्यांनीच उचलली.या कोरोना काळात खात्री पटली की भारतीय माणुसकी कोरोनाने च काय  पण यापेक्षा भयानक काळातही कधीच ग्रासणार नाही...असा हा जगाच्या पटलावर माझा भारत देश अन भारतीय माणुसकी!
              14 दिवस घरच्यांना,गावातल्या मित्र मैत्रिणी, इतर मंडळींना भेटायचं नाही...फक्त एकलकोंडच राहायचं!पण,नाविन्याचा शोध घेण्यात वयाची 22 वर्षे खर्च केली होती,ती सवय या 14 दिवसांत बदलू कशी?मग सुरू केला दिनक्रम!माझी ती जि. प.प्राथमिक शाळा अन शाळेचा परिसर स्वर्गाहुन सुंदर बनवण्याचा!काही गावकरी जे आमची सोय करण्यात रूजु होते त्यांच्याकडेच यादी लिहून दिली अन सामान मागवून घेतलं.खुरपे,कुंड्या,काही फुलझाडे,आंब्याची अन सावली देणाऱ्या झाडाची रोपं... अशी थोडक्यात ती यादी होती.शाळेमध्ये माझ्यासोबत जे लोक राहायला होते त्यांसोबत मी खेळीमेळीचं वातावरण खूपच कमी वेळात तयार केलं होतं.नम्र राहण्याच्या माझ्या स्वभावामुळेच की काय,मला मदतीसाठी कोणी "ना"केली नाही.परंतु,सगळं डागडुजी काम चालू केल ते सोशल distancing ठेवूनच!या रीतीने 14 दिवस रिकामे जाऊ नये,एक-एक दिवस मार्गी लागावा यासाठी सुरुवातीपासूनच दक्ष राहिलो.
          मित्र-मैत्रिणी,भाऊ-बहीण,आई-वडील ,इतर मंडळी अन आप्तेष्ट भेटायला यायचे,लांबूनच hii-hello करायचे,काळजी घ्यायला सांगायचे.इतकी भेट होऊनही राहून राहून घरी जाण्याची इच्छा तीव्र व्हायची.आई भेटायला आली की तिच्या डोळ्यातले भाव पाहून मलाही रडू आवरायचं नाही.मायेचा तो स्पर्श माझ्या डोक्यावरून व्हावा म्हणून मी किती तडफडलो!आईचं ते काळीज..तिच्या लाडक्या लेकासाठी ती आवर्जून गोडा धोडाचं जेवण बनवून आणायची.माझी एकांतातली सगळी मायेची कमी आईच्या हातच्या जेवणानेच  भरून निघायची!
            इतकं भरभरून प्रेम करणारी ही सगळी मंडळी.पण दुसरीकडे आम्हाला भेटून (लांबूनच hii-hello)जाणाऱ्यांना,अन आमच्या सेवेत रुजू स्वयंसेवकांना भेटण्यास ,बोलण्यास गावामधले काही लोक धजावत नसतं. "या लोकांमुळे कोरोना आमच्याकडे पसरला तर ..?"अशा भीतीतच संपूर्ण गाव जगत होतं. शेवटी ज्याचा त्याचा जीव, ज्याला त्याला प्यारा!
            गावामधल्या या भीतीदायक वातावरणातच आमचे swab testing चे report आले.धक्कादायक वार्ता घेऊनच ते आले.'मी' आणि माझ्यासोबत असणारे मुंबईहून आलेले एक गृहस्थ आम्हा दोघा जणांचे reports कोरोना positive निघाले.हा रिपोर्ट तसा मला ही हेलावून टाकणारा होता कारण,कसलीही लक्षणे न आढळता,श्वसनाचा कसलाच त्रास न होता,ताप-खोकला-सर्दी नसताना देखील रिपोर्ट्स positive आले.बहुतेक ही first stage असावी!पण यामुळे सर्वांचीच धांदल उडाली.मला लांबून भेटून गेलेल्या आप्तेष्टांना तर गावकऱ्यांनी अक्षरशः वाळीत टाकलं!
             हे माझ्यापर्यंत कस स्प्रेड झालं या प्रश्नाचं उत्तर मिळायच्या आधीच आम्हाला घेऊन जायला 'सायरन'वाजवत ambulance आली.थोडं फ्लॅशबॅक मध्ये गेलो तर...आम्ही ambulance मध्ये बसल्यावर दार धाडकन लावल्याचा आवाज,डोळ्यातून पाण्याच्या धारा,अन खूपच दुरवर उभे, अगदीच शून्य आकारात दिसत असलेले आप्तेष्ट...इतकंच काय ते आठवतं!
             कोणीही जवळ नाही म्हणून डोळ्यातून पाण्याच्या धारा थांबायचं नाव घेत नव्हत्या.पण ,खूपच दृढ निश्चयाने या क्षणाला त्या तरी माझ्या सोबती आहेत ही माझीच मानसिकता मी बनवत होतो.समुद्राच्या किनाऱ्याला पृथ्वी परिघावर अंत नाही तशीच गत माझ्या आसवांची झालेली होती.
           आयुष्यात यशाकडे वाटचाल करताना,पंखात बळ भरण्याचं काम प्रत्येकाच्या बालपणात प्राथमिक शाळा करत असते,शाळेचा निरोप घेऊन कोरोना युद्धावर निघालेल्या माझ्यामध्ये बळ आणि सकारात्मकता निर्माण करण्याचं काम पुन्हा एकदा  याच शाळेनं केलं."यशस्वी भव!"असा आशीर्वाद च जणू शाळेनं दिला अन आम्ही शाळेचा निरोप घेऊन सातारा सिव्हिल हॉस्पिटल कडे रवाना झालो.
              पीपीई किट्स घालून उपचार करण्यासाठी brave hearts डॉक्टर्स तयारच होते.कोरोनावर लस नाही तरीदेखील कोरोनासोबत लढण्याची ताकद अन जिद्द या शूरवीर डॉक्टरांनीच माझ्यात निर्माण केली.उपचारादरम्यान माझ शारीरीकच नाही तर मानसिक संतुलन ही त्यांनी ढासळू दिले नाही.वीर भारताचा एक नवा 'वीर अध्याय 2020'या वर्षात डॉक्टरांनी बनवलाय.स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करता वॉर्ड बॉय सहित, नर्सेस अन डॉक्टर्स दिवसरात्र कोरोनाला झुंज देत होत्या.नातेवाईक,मित्र-मैत्रिणी,इतरत्र मंडळी हॉस्पिटल visit देऊ शकत नव्हते,तरीही ...यातून लवकरच बरा होशील,धीर सोडू नको,काळजी घे,खचू नको असे कॉल्स येत जात राहायचे ,जरा धीर मिळायचा!परंतु,आयुष्यात जर खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचं असेल तर लढाई एकट्यानेच लढावी लागते,याची खऱ्या अर्थाने अनुभूती माझ्या कोरोना उपचारादरम्यान मला आली.
                  मी कोरोनातून लवकरच बरा होईन असा विश्वास मनात होताच पण या संपूर्ण कालावधीत माझे आप्तेष्ट मला धीर देण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नव्हते.त्यांच्यावरही कोरोनानेच ही वेळ आणली होती!हा 3 महिन्यांचा कालावधी आयुष्याला कलाटणी देणारा ठरला....2020 ची बकेट लिस्ट अन ध्येयधोरण क्षणात बदलून गेली.परीक्षा रद्द झाल्या अन कसलीही पूर्व सूचना न देता माझी मानसिक क्षमता तपासण्याची चाचणी या कोरोनाने घेतली.
             संकटे तुम्हाला हरवायला येत नसतात तर तुमच्यामधल्या ताकदीची जाणीव करून द्यायला येतात.कोरोना नावाचं संकट मी याच बळावर परतवून लावलेलं.आता हॉस्पिटल मधून ही discharge मिळाला ,कोरोनातून पूर्णपणे बरा झालो अन अखेरची कोरोना टेस्ट ही negative आली,खूप जल्लोषात गावकऱ्यांनी माझं स्वागत केलं.
            या कोरोना विषाणू च्या शारीरिक चाचणीतच  नाही तर मानसिक परीक्षेत ही मी उत्तीर्ण झालो!2020 मध्ये या संकटाने मला माझ्यामधल्या अद्भुत संघटन कौशल्याची जाणीव करून दिली,अन आता मी सज्ज झालो उरलेल्या lock down काळात  माझ्या मधल्या क्षमता आणखी द्विगुणित करण्यासाठी आणि आकाशाला गवसणी घालण्यासाठी...!

                    -भक्ती चंद्रकांत पानसरे
                     Forensic science(तृतीय वर्ष)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Taali

 Taali           खरंच कौतुक करावं वाटत , या series मधल्या प्रत्येक कलाकाराचं आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे गौरी सावंत यांची भूमिका केलेल्या सुश्मिता सेन चं ! आपल्यासमोर फक्त टाळ्या वाजवणारे आणि टोल नाक्यांवर ,रेल्वे मध्ये पैसे मागणारे म्हणून ज्यांची प्रतिमा तयार होते त्या व्यक्तीचे वैयक्तिक आयुष्य ,त्याला सोसावी लागणारी स्थित्यंतरे ...खरंच हृदय पिळवटून टाकणारी आहेत . स्त्री आणि पुरुष याच्या ही बाहेर एक नैसर्गिक जीवन आहे पण आपल्यात ते समाजमान्य नाही म्हणून जगण्याचा अधिकार च नाही का? यावरची बरीच उत्तरे 'गौरी सावंत' यांच्या प्रवासातून मिळतात . त्यांचा 'गणेश ते गौरी' हा प्रवास या समुदायाच्या जगण्याविषयी विचार करायला भाग पाडतो .       सिरीज मधले प्रसंग बघून आपल्या आजूबाजूला या घटना होत असतात ,आपण त्याकडे संवेदनशीलतेनेही बघायची तसदी घेत नाही ,त्या किती विक्षिप्त आहेत याची प्रचिती येते. या सिरीज मधला सगळ्यात जास्त टोचलेला प्रसंग तो म्हणजे, नर्गिस ची death आणि त्यानंतर फक्त dead body स्ट्रेचर वर ठेवण्यात यावी या मागणीला असंवेदनशील लोकांनी केलेला विरोध ! हे बघताना खर

तूच तुझी वैरीण

                  आज दुपारी कॉलेज वरून येताना एका ठिकाणी द्राक्षे विकत घ्यायला थांबले. द्राक्षांचा दर उतरत येत असल्याने मी ही पाडून दरात द्राक्षे मागितली .द्राक्षे विकणारी व्यक्ती या एक वयस्कर आजीबाई होत्या .उन्हाची धाप लागून त्यांना चक्कर येत होती.मी माझ्या बॅगेतली पाण्याची बाटली काढून त्यांना दिली.भर उन्हात सहन होत नसतानाही हे काम का करताय असा सहानुभूती पूर्वक प्रश्न त्यांना मी केला . "बाई पोटासाठी झिजावं लागतंय" अस त्या उत्तरल्या. कष्ट केल्याशिवाय तर आयुष्याला पर्याय नाही ,रोजीरोटीसाठी काम करणं हाच संसाराचा राहाटगाडगा यामध्ये नवल नाही पण, "आजी इतकं वय झालेलं असताना ,शरीराला झेपत नसताना का राबताय?" म्हणून विचारलं त्यावर त्या म्हणाल्या "जगत आहे तोपर्यंत माणसाने कामात गुंतवून घेतलं पाहिजे ,आमचे मालक पोरग लहान असतानाच वारले ,एकट्या पोराला घेऊन आज इथवर आले ,इकडं तिकड काम करून त्याच शिक्षण अन लग्न करून दिल,त्याच्या जबाबदारी तुन निवांत झाले पण जगण्यासाठी दोन पैसे घरात आणले पाहिजेत,मी नाही कमवल तर सून घरात आयत देणार नाही .या वयात बाहेरची परवड होणार नाही ग,त्यापेक्षा

थरार

                   नेहमीसारखाच आजही व्यायामशाळेतून यायला उशीर झाला होता .व्यायामशाळेत जाण्यासाठी आम्हाला रोज परळीचा घाट पार करून सातारला जावं लागतं ,अंतर तस फार नाही अकरा किलोमीटर आहे पण रस्ता मात्र घाटाचा अन डोंगररांगांनी वेढलेला ! रात्री अपरात्रीच्या वेळी मुलीनी इतका वेळ घराबाहेर थांबू नये म्हणून घरची मंडळी सतत ओरडतात, पण निशु ताई अन मी काही आमच्या व्यायामाच्या वेळेत हयगय करत नाही. आमच्या ठरलेल्या वेळेत च म्हणजे साडे नऊ च्या दरम्यान घरी येतो . आजही सगळा व्यायाम उरकून , आरशात बघत शरीरयष्टी चे भारदस्त फोटो काढले. फ्रेश होऊन गाडीला किक मारली अन घरी यायला निघालो. व्यायामाने थकलेल्या शरीराला खूप भूक लागली होती , घरी लवकर पोहोचून गरमागरम ताटावर ठाण मांडायला मिळावं म्हणून गाडीचा वेग मी वाढवला होता . सुनसान अशा त्या आडबाजूच्या घाट रस्त्याला गाड्यांची वर्दळ फार नव्हती पण अंधारलेल्या समयी रातकिड्यांच्या कीर्र आवाजात भीतीदायक माहोल तयार झाला होता .वाटेत लागणाऱ्या उरमोडीच्या पुलाशेजारीच गावची स्मशानभूमी आहे .त्या पुलावरून जाताना एका सालात एक तरी बळी 'ती' घेतेच अश