Skip to main content

Posts

Taali

 Taali           खरंच कौतुक करावं वाटत , या series मधल्या प्रत्येक कलाकाराचं आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे गौरी सावंत यांची भूमिका केलेल्या सुश्मिता सेन चं ! आपल्यासमोर फक्त टाळ्या वाजवणारे आणि टोल नाक्यांवर ,रेल्वे मध्ये पैसे मागणारे म्हणून ज्यांची प्रतिमा तयार होते त्या व्यक्तीचे वैयक्तिक आयुष्य ,त्याला सोसावी लागणारी स्थित्यंतरे ...खरंच हृदय पिळवटून टाकणारी आहेत . स्त्री आणि पुरुष याच्या ही बाहेर एक नैसर्गिक जीवन आहे पण आपल्यात ते समाजमान्य नाही म्हणून जगण्याचा अधिकार च नाही का? यावरची बरीच उत्तरे 'गौरी सावंत' यांच्या प्रवासातून मिळतात . त्यांचा 'गणेश ते गौरी' हा प्रवास या समुदायाच्या जगण्याविषयी विचार करायला भाग पाडतो .       सिरीज मधले प्रसंग बघून आपल्या आजूबाजूला या घटना होत असतात ,आपण त्याकडे संवेदनशीलतेनेही बघायची तसदी घेत नाही ,त्या किती विक्षिप्त आहेत याची प्रचिती येते. या सिरीज मधला सगळ्यात जास्त टोचलेला प्रसंग तो म्हणजे, नर्गिस ची death आणि त्यानंतर फक्त dead body स्ट्रेचर वर ठेवण्यात यावी या मागणीला असंवेदनशील लोकांनी केलेला विरोध ! हे बघताना खर
Recent posts

तूच तुझी वैरीण

                  आज दुपारी कॉलेज वरून येताना एका ठिकाणी द्राक्षे विकत घ्यायला थांबले. द्राक्षांचा दर उतरत येत असल्याने मी ही पाडून दरात द्राक्षे मागितली .द्राक्षे विकणारी व्यक्ती या एक वयस्कर आजीबाई होत्या .उन्हाची धाप लागून त्यांना चक्कर येत होती.मी माझ्या बॅगेतली पाण्याची बाटली काढून त्यांना दिली.भर उन्हात सहन होत नसतानाही हे काम का करताय असा सहानुभूती पूर्वक प्रश्न त्यांना मी केला . "बाई पोटासाठी झिजावं लागतंय" अस त्या उत्तरल्या. कष्ट केल्याशिवाय तर आयुष्याला पर्याय नाही ,रोजीरोटीसाठी काम करणं हाच संसाराचा राहाटगाडगा यामध्ये नवल नाही पण, "आजी इतकं वय झालेलं असताना ,शरीराला झेपत नसताना का राबताय?" म्हणून विचारलं त्यावर त्या म्हणाल्या "जगत आहे तोपर्यंत माणसाने कामात गुंतवून घेतलं पाहिजे ,आमचे मालक पोरग लहान असतानाच वारले ,एकट्या पोराला घेऊन आज इथवर आले ,इकडं तिकड काम करून त्याच शिक्षण अन लग्न करून दिल,त्याच्या जबाबदारी तुन निवांत झाले पण जगण्यासाठी दोन पैसे घरात आणले पाहिजेत,मी नाही कमवल तर सून घरात आयत देणार नाही .या वयात बाहेरची परवड होणार नाही ग,त्यापेक्षा

थरार

                   नेहमीसारखाच आजही व्यायामशाळेतून यायला उशीर झाला होता .व्यायामशाळेत जाण्यासाठी आम्हाला रोज परळीचा घाट पार करून सातारला जावं लागतं ,अंतर तस फार नाही अकरा किलोमीटर आहे पण रस्ता मात्र घाटाचा अन डोंगररांगांनी वेढलेला ! रात्री अपरात्रीच्या वेळी मुलीनी इतका वेळ घराबाहेर थांबू नये म्हणून घरची मंडळी सतत ओरडतात, पण निशु ताई अन मी काही आमच्या व्यायामाच्या वेळेत हयगय करत नाही. आमच्या ठरलेल्या वेळेत च म्हणजे साडे नऊ च्या दरम्यान घरी येतो . आजही सगळा व्यायाम उरकून , आरशात बघत शरीरयष्टी चे भारदस्त फोटो काढले. फ्रेश होऊन गाडीला किक मारली अन घरी यायला निघालो. व्यायामाने थकलेल्या शरीराला खूप भूक लागली होती , घरी लवकर पोहोचून गरमागरम ताटावर ठाण मांडायला मिळावं म्हणून गाडीचा वेग मी वाढवला होता . सुनसान अशा त्या आडबाजूच्या घाट रस्त्याला गाड्यांची वर्दळ फार नव्हती पण अंधारलेल्या समयी रातकिड्यांच्या कीर्र आवाजात भीतीदायक माहोल तयार झाला होता .वाटेत लागणाऱ्या उरमोडीच्या पुलाशेजारीच गावची स्मशानभूमी आहे .त्या पुलावरून जाताना एका सालात एक तरी बळी 'ती' घेतेच अश

बलात्कार अन अत्याचाराचा दहशतवाद

                                        16 डिसेंम्बर 2012 च्या रात्री निर्भया बलात्कार घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला.निर्घृणपणे बलात्कार करून खून करण्यात आलेल्या या घटनेविरोधात जागोजागी मोर्चे ,निषेध करण्यात आले .या घटनेचा निकाल लागत नाही तोपर्यंत कोपर्डी येथे 13 जुलै 2016 ला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केलेली घटना समोर आली.हैदराबाद येथे घडलेल्या बलात्कारी घटनेत आरोपींचे एन्काऊंटर करून बळी पडलेल्या स्त्री ला न्याय मिळवून देण्यासाठी एक पाऊल यंत्रणेने उचललं पण आजही आपल्या देशात बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. याच प्रमुख कारण म्हणजे गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती च राहिलेली नाही.न्यायालयात 20-30 वर्षे प्रलंबित राहिलेले खटले आपल्याला आपल्या देशात स्त्री किती सुरक्षित आहे याची साक्ष देतात.  यातूनच सुरू झाला तो म्हणजे स्त्री वरील बलात्कार आणि अत्याचाराचा दहशतवाद..! नुकतेच आंध्र च्या धर्तीवर मंजूर केलेले शक्ती विधेयक बलात्काराचा दहशतवाद रोखण्यासाठी एक ठोस पाऊल ठरते आहे . यामध्ये देण्यात येणाऱ्या मृत्यूदंड शिक्षेमुळे स्त्री वर होणाऱ्

इसवी सन 010101

                             जिवाच्या आकांताने मी धावत सुटले होते.कितीतरी मैल मी धावतच होते पण रस्ता काही संपत नव्हता.भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत एका नवीन टाइमर मशीन वर कॉम्पुटर प्रोग्रामिंग चा सहसंबंध लावण्याच काम करताना अचानक कुठेतरी येऊन पडल्यासारखे वाटलं.4-5 माणसे माझ्या मागे लागली होती,पण खरं ती माणसं च होती की कोण दुसरे प्राणी असा प्रश्न मला पडला, कारण संपूर्ण शरीरयष्टी माणसांसारखीच होती पण अंगावर बऱ्याच ठिकाणी कॉम्पुटर च्या programming languages अन codes लिहिलेले होते.tattoo काढल्यासारखी संपूर्ण शरीरावरची त्वचा नक्षीदार वाटत होती.प्रत्येकाच्या डोक्यावर टोपीऐवजी मुकुट होते.त्या हिरेजडित मुकुटावर चमचमते अँटेना सेन्सर होते.ते लोक कोण आहेत हे विचार करतच मी पळत होते.संपूर्ण शरीर घामाने डबडबलेल होतं अन अचानक कोणीतरी पाठीमागून विनाशस्त्राचाच लेझर प्रहार केल्याचं मला जाणवलं ,क्षणार्धात डोकं सुन्न झाल अन मी धाडकन जमिनीवर कोसळले.मी अर्धवट बेशुद्धावस्थेत होते,त्या माणसाचे बोलणे कानावर पडत होते पण नीट भाषा समजत नव्हती ,तरी त्यांच्या  हालचालीवरून ते मला कुठेतरी नेणार आहेत हे मी ताडल होतं,

काहूर

                                                                                           अंधारलेली काळरात्र... सन्नाटा करणारा आवाज... गर्द झाडीतून ...रस्त्यावरून दमकणार्‍या काजव्यांचं लुकलुकणारं ते रूप... निरभ्र आकाशात शापित चांदण्यांचं राज्य, सूर्याचं साम्राज्य अस्त पावलं म्हणून जणू काही राजा चांदोबाच्या महालात वर्चस्व दाखवणाऱ्या दीड-दमडीच्या 'या' कुशलतेने पृथ्वीवर देखरेखच ठेवत होत्या ... असा हा सगळा प्रसंग असताना ,मी मात्र एक कवी ...काय बरं प्रासंगिक  कविता करणार या सगळ्यावर ?ऐन तारुण्यात बहरलेल्या यौवणावर प्रणयकाळाच्या कविता खरतर सुचायला हव्या होत्या, पण माझ्या मनात  एक भलतीच हुरहुर लागलेली लागलेली होती.निरभ्र आकाशातल्या या चांदण्या पाहून खरंतर प्रेम कविता करण्याचा मोह आज पर्यंत मला कधीच आवरला नाही पण आज... आज माझी मजल यांना शापीत म्हणण्यापर्यंत पोहोचली होती. न राहवता मीच या सर्व विचारातून सुटका मिळवण्यासाठी एक फेरफटका मारून यावं यावं म्हटलं.गस्त घालणाऱ्यांखेरीज आता या घडीला कोण बरं भेटेल ?रात्रीचे सुमारे बारा वाजून गेले होते, "बागुलबुवा येईल हं! बाहेर अजिबात डोकवायचं

14 दिवसांचा पाहुणचार

                                              'दिल है छोटासा ,छोटीसी आशा... आसमानो में उडने की आशा...'अशीच एक छोटीशी माझी इच्छा मी त्या दिवशी बकेट लिस्ट मध्ये लिहून ठेवली. डेहराडून फ्लॅइंग स्कुल मधून pilot licen मिळवायची!2020 मधली ही एक ईच्छा पूर्ण व्हावी म्हणून सगळ्या eligibilities पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो.कॉलेज च्या या शेवटच्या वर्षी तशी आव्हान भरपूर होती...daily च्या assignments, मिड टर्म्स,सेमिस्टर्स, प्रोजेक्ट्स...जबाबदाऱ्याही तितक्याच सक्षमपणे पार पाडत होतो,अगदी कशातच कमी पडत नव्हतो.           तसा तर मी मूळचा सातारा जिल्ह्यातील रहिवासी.सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं राजापुरी हे माझं गाव.12 वी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन इंजिनिअरिंग साठी पुण्यात कॉलेज ला आलो.पहिल्यापासूनच पुणे या शहराविषयी एक भलतंच आकर्षण होत.हॉस्टेल वर राहायला लागलो...थोड्याच दिवसात मला पुणे मानवलं!हॉस्टेल अन कॉलेज मधल्या मित्रांनी अन शिक्षकांनी गावची कमी भासू दिली नव्हती.जे यश मिळवण्यासाठी पुण्यात आलो होतो ते पुणे शहर आता माझी कर्मभूमी बनलेली होती.         सुरळीत चाललेल्या या मेहनती आयुष्यात